नावडती मुले: Navadati Mule (Marathi Edition) por Dr. Sharadchandra Damodar Gokhale

नावडती मुले: Navadati Mule (Marathi Edition) por Dr. Sharadchandra Damodar Gokhale

Titulo del libro: नावडती मुले: Navadati Mule (Marathi Edition)

Autor: Dr. Sharadchandra Damodar Gokhale

Número de páginas: 306 páginas

Fecha de lanzamiento: February 4, 2018

Editor: Book Hungama (Srujan Dreams Pvt. Ltd.)

नावडती मुले: Navadati Mule (Marathi Edition) de Dr. Sharadchandra Damodar Gokhale está disponible para descargar en formato PDF y EPUB. Aquí puedes acceder a millones de libros. Todos los libros disponibles para leer en línea y descargar sin necesidad de pagar más.

Dr. Sharadchandra Damodar Gokhale con नावडती मुले: Navadati Mule (Marathi Edition)

प्रस्तावना
‘‘मूल आणि फूल’’ ह्या दोन गोष्टींची तुलना करण्याचा संकेत प्राचीन काळापासून चालत आला आहे. ‘‘वंशवृक्षाला आलेली सुकुमार फळे’’ अशा लालित्याने मुलांवषयींचा उल्लेख आपणास गतिमान् रूढीतही आढळून येतो.
‘‘मूल’’ ह्या शब्दाचा प्रयोग केल्याबरोबर आपल्या मनात कितीतरी मधुर गोष्टींच्या संवेदना उत्पन्न होतात! भगवान गोपालकृष्णाचे बालपण एखाद्या सहृदय माणसाच्या हृत्पटलावर उभे राहील. भगवान रामचंद्रांची पितृभक्ती कित्येकांना आकर्षित करील तर, भक्तोत्तम ध्रुवबालाची आणि कुमार एकलव्याचे गुर्वाराधन काही सहृदयांच्या मनाचा ठाव घेईल. निरागस प्रेमाचा आविष्कार करणारे मुखकमल, भवितव्यतेच्या आज्ञान गिरिकुहरांचे जणू शोधन करणार्‍या नेत्रदीपिका, कुंदाचा कळ्यांनाही लाजविणार्‍या दंतपंक्ती आणि प्राचीच्या अरुणप्रभेसही लाजविणारे निरलस बालहास्य कोणाला मोहीत करणार नाही?
क्षणभर हा कल्पनाविलास बाजूला ठेवला आणि तर्काच्या निकषावर बालत्वाचे महत्त्व घासून पाहिले तरी त्याची महती रतिमात्र कमी ठरत नाही. आजची गोजिरवाणी मुले ही उद्याचे नागरिक होत. वर्धमान राष्ट्रवृक्षाचे सिंचन करून त्याचे प्रवर्धन करणार्‍या अमृतधारा म्हणजे आजची मुले. आमच्या ह्या सार्वभौम प्रजासत्ताक राज्यमंदिराचे सुवर्णस्तंभ म्हणजे आजची मुले. दिगंतरांत आमच्या मातृभूमीच्या ऐश्वर्याचा निनाद उठविणारी महाशक्ती म्हणजे आजची मुले.